शेतकऱ्यांसाठी रेल्वेचा प्रतिसाद! महिन्याला सरासरी एक लाख वॅगनमधून मालवाहतूक 

नाशिक रोड : शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीसाठी रेल्वेने सुरू केलेल्या किसान रेलला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १२ हजार ४०० टनाहून अधिक वाहतूक झाली आहे. सात महिन्यांत साडेसहा लाखांहून अधिक वॅगनने शेतमालाची वाहतूक झाली. महिन्याला सरासरी एक लाख वॅगनमधून देशभरातून मालवाहतूक सुरू आहे. 

विविध वस्तूंची वाहतूक
देवळाली रेल्वेस्थानकातून सुरू झालेल्या या पहिल्यावहिल्या किसान रेलला सातत्याने प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सांगोला, नागपूर येथूनही किसान रेल सुरू करण्यात आल्या आहेत. किसान रेलमधून डाळिंब, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फात ठेवलेले मासे आणि इतर पार्सल यासारख्या नाशवंत वस्तूंची वाहतूक होऊ लागली आहे. देवळाली ते मुझफ्फरपूर (त्री-साप्ताहिक), नागपूर ते आदर्शनगर, दिल्ली (साप्ताहिक) आणि सांगोला ते मनमाड (त्री-साप्ताहिक) आणि सांगोला ते सिकंदराबाद (साप्ताहिक) किसान रेल्वेगाड्या सुरू आहेत. मध्य रेल्वेने ७५ हजार २८२ टन जीवनावश्यक वस्तू जसे की औषध आणि फार्मा उत्पादने, ई-कॉमर्स वस्तू, टपाल आणि इतर हार्ड पार्सल ५९७ पार्सल विशेष गाड्याद्वारे वाहतूक केली. सात महिन्यांत मध्य रेल्वेने सुमारे १३ हजार ४०० मालवाहतूक गाड्या चालवल्या. रोज सरासरी दोन हजार ७७६ वॅगनप्रमाणे एकूण ६.४४ लाख वॅगनमधून विविध वस्तूंची वाहतूक केली आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

वॅगन मालवाहतूक 
२.५० लाख - कोळसा 
१.९५ लाख - कंटेनर 
४२९८५ वॅगन - सिमेंट 
५१२७ वॅगन - अन्नधान्य 
३०२२२ वॅगन - खते 
६०५४१ वॅगन - पेट्रोल, तेल व वंगण 
१६८७३ वॅगन पोलाद 
३३०३ वॅगन साखर 
७८०५ वॅगन कांदा 
२३२७ वॅगन कडबा 
२८७२७ वॅगन इतर माल  

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात