शेतकऱ्याच्या मुलीची महाराष्ट्रभर भ्रमंती !

नाशिक : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील २१ वर्षीय शेतकऱ्याची मुलगी प्रणाली चिकटे पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलवरून निघाली असून गुरूवारी (ता.११) सायंकाळी प्रणालीचे नाशिक शहरात आगमन झाले. सायकलने महाराष्ट्र भ्रमंती करतांना आतापर्यंत प्रणालीला पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रकारचे अनुभव येत आहे. प्रणालीने चंद्रपूरमधून बीएडब्लूचे शिक्षण घेतले असून सायकलने महाराष्ट्र भ्रमंती ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. (व्हिडिओ - केशव मते)