“शेतीची पंचनामे होतील; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” – कृषिमंत्री

लखमापूर (जि. नाशिक) :  निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाला असला तरी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. सर्व नुकसानग्रस्त शेतीची पंचनामे होतील. शासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. जऊळके वणी येथील नुकसानग्रस्त द्राक्षबागांना भेटीप्रसंगी ते बोलत होते.

भुसे म्हणाले, की नुकसानग्रस्त सर्वच बागांचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नक्की मदत मिळेल. ज्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे असा एकही शेतकरी पंचनाम्यातून सुटणार नाही. याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. या वेळी येथील प्रगतिशील शेतकरी केशव शेळके यांच्या नुकसानग्रस्त बागेस त्यांनी भेट दिली. परिसरातील शेतकरी, तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. 

या वेळी माजी आमदार धनराज महाले, शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील, भास्कर बनकर, शिवाजी दवंगे, शंकर दवंगे, उपसरपंच योगेश दवंगे, सुदाम दवंगे, केशव दवंगे, वसंत दवंगे, गणेश दवंगे, अविनाश दवंगे, नामदेव दवंगे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा