शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

bharti pawar www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह अवकळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकासह गहू, हरभरा या रब्बी पिकांचे तसेच द्राक्षबागा व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र देऊन केली असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरभरा व इतर रब्बी पिके भुईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन दिवसांत बाधित झालेले १९१ गावे व संभाव्य बाधित होणाऱ्‍या गावांमध्ये अंदाजे २६०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असल्याने कष्टकरी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे, असेही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

The post शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.