Site icon

श्रमिकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेला नेता; कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर (वय ७५) यांचे रविवारी रात्री नाशिक येथील डॉ. कराड हॉस्पिटल येथे निधन झाले. रविवारी (ता. २) सायंकाळी ८. ३० वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 2019 पासून ते कर्करोग आजाराशी संघर्ष करत होते. महिनाभरापासून त्यांची तब्येत बिघडल्याने पुणे, मुंबई व नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांचा अंत्यविधी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. मोड, नंदुरबार येथे होणार आहे.

कॉ. सिताराम येचूरी यांच्या नेतृत्वाखाली चीनला गेलेल्या भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. हे महाराष्ट्रातील शोषित, श्रमिक, शेतमजूर, दलितांच्या चळवळींबरोबर काम करतात. श्रमिकांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात तुरूंगवास भोगलेले, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या शोषणाविरोधात लढा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी केंद्रीय कमिटी सदस्य असा सामाजिक कार्याचा आढावा आहे.

१९७४ साली शिराळकर यांची लिहिलेल्या उठ वेडया, तोड बेड्या ही पुस्तिका प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या आहेत. जाती अंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती व ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मिमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्मांधतेचे राजकारण इत्यादी विषयांवर शिराळकर यांनी लिखाण केले आहे. संदर्भ हवा पुण्यातील चालणाऱ्या मागोवा गटाचे ते सदस्य आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी, शेतमजूर यांच्यावरील शोषणाविरोधात आणि आदिवासींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी १९७० च्या दशकात त्यांनी काम केले. ते मुंबई आय आय टी चे विद्यार्थी होते. ते डाव्या विचारसरणीच्या संशोधकांचे आणि कार्यकर्त्यांचे स्फूर्तीस्थान होते.

त्याचा अंत्यविधी कमरेड बीटी रणदिवे हायस्कूल, मोड, तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे 3 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी सायंकाळी ४.०० वाजता होईल.
– काॕ. कराड यांचा संदेश

हेही वाचा

 

The post श्रमिकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेला नेता; कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन appeared first on पुढारी.

Exit mobile version