Site icon

श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिशभाई पटेल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबईच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांची पुनश्च अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येऊन सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री विलेपार्ले केळवाणी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विलेपार्ले-मुंबई व शिरपूर कॅम्पस या दोन ठिकाणी मतदान घेण्यात आले. त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ अध्यक्ष पदासाठी आमदार अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना 1685 मते मिळाल्याने ते भरघोस मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

सहा ट्रस्टी पदासाठी उमेदवारनिहाय मिळालेले मतदान पुढील प्रमाणे :

आमदार अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना 1693 मते, भूपेशभाई रसिकलाल पटेल 1685, चिंतन अमरिशभाई पटेल 1674, स्नेहा ए. पारेख 1669, भरत एम. संघवी 1656, हर्षद एच. शाह 1652.

मॅनेजिंग कमिटीच्या 30 सदस्य यांना मिळालेली मते :

गांधी जयंत पी. 1645, मेहता किरीट पी. 1644, चोकसी जयेश पी. 1643, चितलिया हरित एच. 1640, दोशी प्रविण एच. 1639, किल्लावाला जगत ए. 1633, पटेल नयन एम. 1631, पारेख स्नेहा ए. 1629, मेहता तुषार एच. 1627, दिवतिया सुनंदन आर. 1626, पटेल भार्गव एन. 1625, पटेल मुकेश एच. 1625, पारिख जगदिश बी. 1624, शेठ अमित बी. 1621, देसाई संजय ए. 1619, पटेल मुकुल पी. 1619, पटेल हरीष जे. 1618, शाह हर्षद एच. 1618, भिमानी जतिन 1616, भंडारी राजगोपाल सी. 1615, वैद्य विवेक सी. 1615, शाह पृथ्वीराज सी. 1614, शेठ नरेश के. 1612, दुदेजा रणजीत 1610, शाह मुकेश ए. 1610, पटेल महेरदास जे. 1609, कावा हर्षद बी. 1608, पटेल वैभव सी. 1607, शाह विशाल एच. 1607, पटेल विनोद एम. 1606.

श्री विलेपार्ले केळवाणी मंडळचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल यांनी संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे मोठे जाळे विणले आहे. देशभरात अनेक शैक्षणिक दालने सुरू करून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले.

अमरिशभाई पटेल यांनी संस्थेला प्रगतीपथावर आणून अनेकविध महाविद्यालयांची निर्मिती करून शैक्षणिक घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. अतिशय अभ्यासूपणे व कुशलतेने संस्थेला पुढे नेण्याचे काम अमरिशभाई पटेल यांनी केले असून त्यांच्यावर मतदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवून एकतर्फी विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचा :

The post श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिशभाई पटेल appeared first on पुढारी.

Exit mobile version