संगमनेर : दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीतील टोळी साहित्यासह पोलिसांनी पकडली

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : समनापुर चौफली पुणे बायपास रोडला श्रीगणेश ट्रेडर्सचे पत्र्याचेशेडचेआडोशाला पाच दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तीन अल्पवयीन चोरांसह चार दरोडेखोरांना पळून जाताना संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यातील चार इसमाना ताब्यात घेतले व एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहर पोलिसांचे पथक समनापुर चौपोलीपासून पुणे रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोलींग करीत असताना गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास पाच जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते हे पाहताच पोलिसांनी तीन अल्पवयीन चोरांसह एक अट्टल चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले मात्र एक जानेवारीचा फायदा घेऊन फरार झाला

पोलीस पथकाने पकडलेल्या दरोडेखोरांकडून छ-र्याची एअर गन, लोखंडी गज, गलोर, मिरच्याची पुड,लाकडी दांडा, स्कु ड्रावर, बजाज कंपनीची काळे रंगाची बिना नंबरची पल्सर मोटार सायकल, HF डिल्कस बिना नंबरची मोटार सायकल असा एकून १,२३,५००/- रु किच्यादरोडा टाकण्याचे साहित्य व वाहना असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश चंद्रभान गायकवाड (वय २३ रा-खांडगाव ता. संगमनेर) आणि १७ वर्षाची ३ अल्पवयीन मुले अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा ५ वा साथीदार रविंद्र राधाकिसन डेंगळे अंधाराचा फायदा घेत फरार झाला. रात्री रस्त्याने येणारे जाणारे वाहने अडवून त्यांना हत्याराचा धाक दाखवुन लुटमार करण्याच्या तयारीत असल्याची कबुली पकडलेल्या चारही चोरट्यांनी पोलिसांना दिली दिली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सुचनेनुसार संगमनेर शहर पो नि भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल माळी, पो हे का विजय खाडे, पो.ना विजय पवार, पो हे कॉ विशाल कर्पे, अविनाश बर्डे, रोही दास शिरसाठ, अजित कु-हे, बाचकर, शरद पवार, चा.पो .ना.मोरे, यांनी केली

The post संगमनेर : दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीतील टोळी साहित्यासह पोलिसांनी पकडली appeared first on पुढारी.