संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?

संजय राऊत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांना त्यांचे वक्तव्य चांगलेच भोवणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

संजय राऊतांचे हे विधान शिंदे गटाच्या खुपचं जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्री शिंदेंबद्दल बोलाल तर याद राखा. माफी मागा नाहीतर नाशिक मध्ये फिरू देणार नाही. संजय राऊत शरद पवारांचे शिवसैनिक आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा शिवसैनिक काय असतो तुम्हाला दाखवून देऊ, अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी मांडली आहे.

हे वक्तव्य राऊतांना भोवणार…

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर देखील आरोपांची झोड उठवली. ठाकरे गटाने शिंदे गटावर तिखट शब्दांत टीका केली. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालावर केंद्रीय मंत्री अमित सहा यांनीही प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले. पुणे दौऱ्यावर असताना अमित सहा यांनी ‘मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केले,’ असे विधान शाह यांनी केले. दरम्यान त्यांच्या विधानावर उत्तर देणार नाहीत ते संजय राऊत कसले? त्यांच्या विधानानंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. मात्र ते करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले. ‘हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. असे विधान राऊतांनी केले आहे.

हेही वाचा :

The post संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार? appeared first on पुढारी.