वणी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील चारोसे येथे एका अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीवर चक्क चुलत काकानेच बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
वणी पोलीस ठाणे हद्दीत चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी गुरुवार (दि.१३) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना मुलीचा चुलत काका याने तिला घरासमोरुन घेऊन गेला. मुलगी बराच वेळानंतरही दिसेनाशी झाली म्हणून मुलीची आई व तिच्या घरातील तसेच शेजारी राहणाऱ्या आजू बाजूचे लोकांनी मुलीचा शोध घेतला. मात्र गुरुवार (दि.१३) रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास मुलगी घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयीत २१ वर्षीय आरोपी (राहणार- चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक) मुलीसह दिसुन आला. त्याने अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने तत्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीचे आईचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोस्को कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील करीत आहेत .
हेही वाचा: