संतापजनक! गुन्हा लपवण्यासाठी आवळला नऊ वर्षाच्या चिमुरड्याचा गळा; दोन संशयित ताब्यात

नाशिक रोड : नऊ वर्ष  वय असलेल्या रामजी या चिमुकल्याला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाने भाजीपाला आणण्याच्या बहाणा करत सोबत घेतले.  त्या मुलाला खाऊचे प्रलोभन दाखवून गाडीत बसवून ठेवले.. मात्र रामजी  रात्री उशीरपर्यंत घरी परतलाच नाही, बुघवारी या नऊ वर्षाच्या चिमुरड्याचा थेट मृतदेहच सापडला.. वाचा नेमकं काय घडलं..

सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गाडेकर मळा येथील रामजी लालबाबू यादव (वय ९) या मुलाला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाने भाजीपाला आणण्याच्या बनाव करुन सोबत घेत नाशिकरोडला ओम्नी कारमधून नेले. नाशिकरोड येथे त्या युवकाचा दुसरा साथीदार कारमध्ये बसला आणि त्यांनी रामजीला खाऊचे प्रलोभन दाखवून कारमध्ये बसवून ठेवले. यावेळी सिन्नरफाटा येथे सिन्नर जाणाऱ्या एका प्रवाशालाही त्यांनी गाडीमध्ये बसविले.

प्रवाशाला मारहाण करत लूटले

अनिल आव्हाड (२६,केपानगर, सिन्नर) याने याला आक्षेप घेत त्यांना इकडे कोणत्या रस्त्याने जात आहे? असे विचारले असता त्यांनी गाडी एका ऊसशेतीच्या मळे परिसरात उभी करुन विजय यास मारहाण करत चाकूचा एवढेच नाही तर त्याला धाक दाखवून त्याचा मोबाइल, चार हजाराची रोकड देखील हिसकावून घेतली आणि  त्याच्या हातावर चाकूने वार केला. सुदैवाने यावेळी पाठीमागून दुसरे वाहन आल्याने य हल्लेखोरांपनी विजय यास तेथेच सोडून मुलाला घेऊन ओम्नीतून पळ काढला.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

घाबरलेल्या आई वडिलांची पोलिसात धाव

यानंतर हल्लेखोरांपैकी रामजीच्या घराशेजारी राहणारा युवक रात्री घरी आला असता मुलाच्या आईवडिलांनी त्याला त्यांचा मुलगा कोठे आहे? असे विचारले  मी तुमचा फोन आला तेव्हाच त्याला सायंकाळी घराजवळ आणून सोडले होते असे सांगितले. मात्र घाबरलेल्या आईवडिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगीतला. यानंतर पोलिसांनी तत्काळ सिन्नर पोलिसांनाही मुलाचा शोध घेण्याबाबत कळविले आणि दोघा संशयितांचा शोध घेत ताब्यात घेतले आहे.

चोरीचा गुन्हा लपवण्यासाठी 

नंतर या फक्त नऊ वर्षीय मुलाचा निघृणपणे खून करुन त्याचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील एका नदीकाठावर फेकून या अज्ञात मारेकऱ्यांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.२) उघडकीस आली. प्रवाशाची जबरी लूट केल्याचा हा सगळा प्रकार नऊ वर्षीय रामजीसमोर घडल्यामुळे गुन्हा लपविण्यासाठी संशयित हल्लेखोरांनी मुलाचाही गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह सिन्नर पोलिसांच्या हद्दीतील डुबेरे गावाच्या शिवारात एका नदीकाठालगत फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

 

.