संतापजनक प्रकार! पॅकिंग किटअभावी मृतदेह ६ तास पडून; पाचशेचे कीट देतायत हजार रुपयांना, पाहा VIDEO

नाशिक  : येथील हॉस्पिटलमध्ये मृतदेहाला पॅक करण्यासाठी महापालिकेत पॅकिंग कीट नसल्यामुळे मृतदेह सहा तास पडून राहिला. येथील कर्मचाऱ्यांनी चक्क बाहेरून विकत किट आणून दिले. पाचशे रुपये तिकीट हजार रुपयाला आणून दिल्याने नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले. या वेळी बिटको हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी बिटको प्रशासनाशी वाद घालत परिस्थिती सुधारण्याची विनंती केली. 

धंदा करीत असल्याचा आरोप

बिटको हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये एक मृतदेह पॅकिंग किट अभावी सहा तास तसाच पडून होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पॅकिंग किट बाहेरून आणायला लावले. ही पॅकिंग किट एका कर्मचाऱ्याने एक हजार रुपयाला आणून दिले. बाजारात पाचशे रुपयेची पॅकिंग किट हजार रुपयाला आणून दिल्याने नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले. येथील बिटको कोविड सेंटर येथे स्वच्छता कर्मचारी सध्या वैद्यकीय उपकरणांवर ज्यादा पैसे आकारत धंदा करीत आहे. सामाजिक कार्यकर्ते राम बाबा पठारे, माजी नगरसेवक हरीश भडांगे व कार्यकर्त्यांनी बिटको सेंटर प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. बिटको हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये मृत्युदर वाढत असल्याचे दिसून येत असून शासनाने लवकर कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

बिटको हॉस्पिटलमध्ये कर्मचारी कमी असल्याने रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही. पर्यायाने मृत्यू ओढावत आहे. या ठिकाणी सुविधा कमी आहे, किती दिवस झाले तरी नाशिक महापालिकेने येथे कर्मचारी भरती केले नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर मृत्युदर वाढत जाऊन सामान्य कष्टकरी शोषित गरिबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतील. 
- रामबाबा पठारे, माथाडी कामगार संघटना