संतापजनक! मॉर्निंग वॉकला गेलेली विवाहिता परतली थेट 18 दिवसांनी; सांगितली आपबिती

नाशिक : (सटाणा) वीस वर्षीय विवाहिता मॉर्निंग वॉकला गेली तर परतलीच नाही. काही काम आलं असेल म्हणून घरच्यांना जरा वाट बघितली. मात्र ती दुपार झाली तरी ती माघारी आली नाही. तेव्हा घरच्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. सासरी अन् माहेरीही सगळ्यांच्याच जीवाला घोर लागला. विवाहिता परतली ती थेट अठरा दिवसांनी...तिने सांगितला संतापजनक प्रकार. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

शनिवारी (ता. 14) सटाणा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली. शहरात केळी विक्रीचा व्यवसाय करणारी महिला २१ ऑक्टोबरला सकाळी भाक्षी रोडला मॉर्निंग वॉकला जात असतांना भाक्षीच्या खंडेराव महाराजांच्या गडाजवळ मुळाणे येथील सचिन तानाजी खेताडे (३२), भगवान गवळी (३८), पप्पू बंडू नाडेकर (३६), संदीप भावडू नाडेकर (४०) यांनी अडविले. तिला मोटारसायकवर जबरदस्ती बसवून दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेले. तेथे त्यांनी विवाहितेला दररोज जबरदस्तीने मद्य पाजून सामुहिक अत्याचार केला. ८ नोव्हेंबरला महिलेने चौघांना विश्वासात घेऊन दमण येथे माहेरी जाण्याची व्यवस्था करून द्या, अशी विनंती करत स्वत:ची सुटका करून घेतली.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता. अचानक माहेरच्या मंडळींनी मुलगी आल्याची माहिती दिली. सटाण्याला सासरी आल्यावर पीडितेने झालेला प्रकार सांगितली. मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लागला. मोबाइल नंबर व अत्याचार केल्याचे ठिकाण याची पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून माहिती घेतली. त्यानंतर चौघांच्या घरांवर छापे टाकून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, १६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात