संतापजनक! रस्त्यात दोन महिलेचा रिक्षाचालकाकडून विनयभंग; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सातपूर (नाशिक) : अशोकनगरमध्ये रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. अशा घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काय घडले नेमके?

महिंद्र कंपनीच्या मटेरियल गेटसमोर फिर्यादी महिला व त्यांची मामे बहीण सोमवारी (ता. २२) दुपारी सव्वाचारच्या सुमारास रस्त्याने जात असताना, रिक्षा (एमएच १५, एफक्यू २८५४) चालकाने अचानकपणे रिक्षा थांबवून फिर्यादी महिलेच्या मामेबहिणीचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान, फिर्यादी महिलेने मामेबहिणीस त्याच्या तावडीतून सुटका केली. नंतर रिक्षाचालकाने फिर्यादी महिलेस धक्काबुक्की करून तिचाही विनयभंग केला.  

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

गुन्हा दाखल

अशोकनगरमध्ये रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी सातपूरचा रिक्षाचालक अक्षय गिरीश जोशी (रा. महादेव मंदिराजवळ, श्रमिकनगर) यास सातपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले