संभाजी भिडेंच्या वक्तव्याची माहिती मोदींना द्यावी : छगन भुजबळ

छगन भुजबळ, संभाजी भिडे,www.pudhari.news

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी ऑनलाइन

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची शासनाने दखल घेऊन कडक कारवाई करावी, त्यांना अटक करावी. तसेच पंतप्रधान मोदी हे उद्या पुणे येथे येणार आहेत, त्यावेळी त्यांच्या कानावर हा विषय घालावा असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

भुजबळ म्हणाले,  संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य केलं. त्यानंतर आणखी पुढे जावून महात्मा फुले यांच्याबद्दलही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं.  भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की, या मागचा बोलवता धनी कुणी दुसरा आहे ? ते पाहायला हवे, अशा लोकांना पाठिशी घालणा-यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असे भुजबळ म्हणाले.

दुर्देवाने बहुजन समाजाचीच काहीलोक भिंडे यांच्या मागे फिरताय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही अतिशय दुर्देवी बाब आहे. सरकारने कठोर पावले उचलून भिंडेना अटक करावी त्याशिवाय ते ठिकाण्यावर येणार नाही अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी आज केली. दरम्यान कालही छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. संभाजी भिडे यांचे डोके ठिकाण्यावर नसल्याचे वक्तव्य भुजबळांनी केले होते.

The post संभाजी भिडेंच्या वक्तव्याची माहिती मोदींना द्यावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.