सकाळचे वृत्त ठरले अचूक! अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक : साहित्यिक आणि वाचकांसाठी पर्वणी असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निश्चित वेळेत होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे वृत्त इ सकाळने सर्वात आधी  प्रसिध्द करत संमेलन स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान येथे दिनांक २६, २७ व २८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेलले ९४ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. येत्या काळात कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याचा विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगीतले. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळान ठरविले होते पण नोहेंबर मध्ये नोहेंबरमध्ये कोरोनाची लागण कमी होत गेली आणि डिसेंबरपर्यंत ती पूर्णपणे आटोक्यात आली. त्यामुळे संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची जोरदार तयारी सुरु केली होती. निधी संकलन व इतर तयारीला वेग आला असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सध्या संमेलन रद्द करण्याएवजी स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

कोरोना ही नैसर्गीक आपत्ती आहे. या आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही, म्हणून कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर नाशिकच्या साहित्य मंडळाशी चर्चा करुन हे संमेलन घेता येईल अशी माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष तसेच सर्व निमंत्रीत साहित्यिक यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. तसेच हे संमेलन २०२१ मध्येच घ्यावे अशी महामंडळाची अपेक्षा आहे.