सकाळ IMPACT : बोनस व पगारवाढ मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी उत्साहात

एकलहरे (नाशिक) : "बोनस तर सोडाच, किमान वेतनही मिळेना; कंत्राटी कामगार चिंतेत' या शिर्षकाखाली इ-सकाळ ऑनलाईनला वृत्त प्रसिद्ध झाल्यावर नाशिक औष्णिक वीज केंद्रातील दिवाळीच्या दोन दिवस आधी तर काही कंत्राटी कंपन्यांनी तर कामगारांना सात हजार पगार व काहीअंशी पगारवाढ दिल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण आहे. या कंत्राटी कामगारांनी दैनिक 'सकाळ'चे आभार मानले आहेत.

एकलहरे वीज केंद्रात सुमारे हजार ते दीड हजार कंत्राटी कामगार काम करत असून यातील काही कंत्राटदारांनी अनेक कामगारांचे PF, ESI ही भरले नाहीत तसेच जानेवारी 2020 पासून किमान वेतनाचे दर वाढूनही अद्यापही कामगारांना पैसे मिळाले नव्हते.त्याचप्रमाणे निम्म्याहून अधिक लोकांचे PF त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही ही व्यथा आहे. असे असताना इ सकाळ ला ऑनलाईन वृत्त प्रसिद्ध झाल्यावर  कंत्राटी कामगारांना बोनस व काहीप्रमाणात हजेरीत वाढ झाली त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून आला व भविष्यात ही हक्काची पूर्ण  पगार वाढ होईपर्यंत लढा सुरू राहील असे काही कामगारांनी सकाळशी बोलतांना सांगितले .

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

 

दैनिक सकाळ मध्ये इ सकाळ ला वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, कंत्राटी कामगारांना काहीअंशी पगारवाढ व बोनस मिळाला. त्यामुळे सकाळचे आभार. व भविष्यात ही असेच सहकार्य अपेक्षित- पिराजी जगताप( कंत्राटी कामगार)

कामगारांची आर्थिक पिळवणूक वर्षानुवर्षे सुरू असून दिवाळीचा बोनस मिळाला त्यामुळे गरिबांची दिवाळी आनंदात गेली.-शेवंता पवार (कंत्राटी कामगार)
 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला