सत्यजीत तांबे यांचे कॉंग्रेसमधून निलंबन, मविआचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा

शुभांगी पाटील, सत्यजीत तांबे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीने आज आपली भूमिका जाहीर केली आहे. नाशिकमध्ये मविआचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे जितेंद्र  आव्हाड व शिवसेनेचे अंबादास दानवे या तीघांनी पत्रकारपरिषद घेत आज शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. सत्यजित तांबेवरही आजच कारवाई केली जाईल, त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाशिकमध्ये कॉंग्रेसच्या विचारधारेवर सुधीर तांबेंना तीन वेळा पदवीधरांनी निवडून दिले. यावेळेलाही पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. तांबे परीवाराला आम्ही निलंबीत केले आहे. बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलू, त्याच्याकडून काही भूमिका आली तर ती आम्ही स्पष्ट करु असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

The post सत्यजीत तांबे यांचे कॉंग्रेसमधून निलंबन, मविआचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा appeared first on पुढारी.