सदैव हसतमुख ‘मुस्कान’ कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

नाशिक : मुस्कान ही घरातील लाडकी लेक...सदैव हसतमुख असणारी मुस्कान आता मात्र कायमचीच शांत झाली आहे. काय घडले नेमके?

सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली

घरातील लाडक्या मुलीचा मृत्यू झाल्याने अन्सारी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सिलिंडरच्या स्फोटात भावापाठोपाठ बहिणीचा रविवारी (ता. ११) सकाळी मृत्यू झाला. मुस्कान वलिउल्ला अन्सारी (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे.सारडा सर्कल भागातील इगतपुरी चाळ येथील संजरीनगर सोसायटीच्या प्लॅट क्रमांक सातमध्ये शुक्रवारी (ता. २) रात्री अकराच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात आठ जण गंभीर भाजले होते. सईदा सय्यद, नसरीन सय्यद, लियाकत सय्यद, नुसरत सय्यद, सोहेब अन्सारी, रमजान अन्सरी व मुस्कान अन्सारी यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

तिघे भाऊ-बहिणींचा मृत्यू

पाच दिवसांत एकापाठोपाठ एक तिघे भाऊ-बहिणींचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली. जखमी आरिफ सलीम अत्तार (५३) यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ