सप्तशृंगगडावर ५ एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’; भगवतीचे दर्शनही याकाळात बंद

वणी (जि.नाशिक) : सप्तशृंगगडावर ग्रामस्थांची कोविड तपासणी केली असता ३८ ग्रामस्थ पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच तालुक्यात व जिल्ह्यात वाढत्या संसर्गामुळे सप्तशृंगगडावर ३१ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला आहे.

सप्तशृंगगडावर ५ एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ 

आदिमाया भगवतीचे दर्शनही भाविकांना याकाळात बंद राहाणार असल्याची माहिती विश्वस्त मंडऴ व ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली. नाशिक जिल्ह्यात तसेच श्रीक्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण आढळल्यामुळे ग्रामपंचायत, सप्तशृंगगड यांनी ‘जनता कर्फ्यू’संदर्भात निर्णय घेतला. भगवतीचे मंदिर गुरुवार (ता.१) पासून ते सोमवार (ता. ५)पर्यंत पूर्णपणे बंद असेल. भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सुरू असेल. भाविकांनी याची नोंद घेऊन विश्वस्त संस्थेसह जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व विश्वस्तांनी केले आहे.  

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण