
कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगगड घाट रस्ता आज बुधवारी (दि. १९) सुमारे सहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जुलै रोजी गडावरील अवघड अश्या गणपती टप्प्यावरून बस ४०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातातील बस काढण्यासाठी हा घट बंद ठेवण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी व कळवणचे प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांनी सकाळी ९.४५ ते ४ वाजेपर्यंत घाट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भाविकांनी या काळात गडावर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- भारत-फ्रान्स मैत्री पर्व
- NCP Praful Patel : राष्ट्रवादी एनडीएचा अविभाज्य घटक, भविष्यात एकत्र काम करू : प्रफुल्ल पटेल
- एटीएम फोडले आम्ही नाही पाहिले ! चोरीचा ना बँकेला, ना सुरक्षा कंपनीला थांगपत्ता
The post सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.