सप्तशृंगी गडावर गुटखा विक्री, पोलीस पथकाची कारवाई

सप्तशृंगीगड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगीगड येथे नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे सप्तशृंगीगड येथे गुटखा विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने कारवाई केली.

काल (दि.१६) संध्याकाळच्या दरम्यान सप्तशृंगीगड येथील साई जनरल स्टोअर्स, शिवालय रोड येथे तपासणी केली असता सदर दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पांनमसाला व तंबाखू असा गुटखा सदृश माल मिळाला. सदर मालाची किंमत ३८५१ इतकी होती. दुकानदार निलेश पाटील याने गुटखा विक्रीचा धंदा आर्थिक फायद्यासाठी करत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु बिजलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

The post सप्तशृंगी गडावर गुटखा विक्री, पोलीस पथकाची कारवाई appeared first on पुढारी.