सप्तशृंगी घाटात : काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुके….

सप्तशृंगीघाट,www.pudhari.news

सप्तशृंगगड: पुढारी वुत्तसेवा :

साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे तिर्थक्षेत्र असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावरील घाट रस्त्यांना हिरवंगार स्वरुप प्राप्त झालं आहे. या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येणारे पर्यटक व भाविकभक्त काय ती झाडी, काय ते धुके, काय तो घाट….. असं वर्णन करत या निसर्गसौदर्यांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

घाटातील हिरवीगार झाडी, दाट धुके, पडणार पाऊस यामुळे घाटाला सुंदरस्वरुप प्राप्त झाले आहे. पर्यटक यासर्वांचा आनंद घेत आहेत. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश सह भारतातून लोक येत असतात.  गडावर येण्यासाठी 10 कि.मी चा घाट पार करून यावा लागतो. या घाटातील दृश्य बघून भाविक प्रसन्न होऊन जातात. घाटात ठिकठिकाणी वाहणारे लहान- मोठे धबधबे, विविध पक्षी, मोर हे सर्वच या घाटाच्या सौदर्यात अधिकची भर घालत असतात. त्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे हिरवळ होत असते. हीच हिरवळ पर्यटकांना आकर्षित करत असल्याने मोठ्या संख्येने देवीचे भक्त व पर्यटक येथे येतात. याहीवर्षी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ठिकठिकाणी मका, भाजलेल्या शेंगा, गरमागरम चहा-भजी याचाही आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.  येथील जंगलात फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना झाल्याशिवाय राहत नाही. एकुणच काय तर येथील निसर्ग सौदर्यांची भुरळच पर्यटकांवर पडते.

आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतो. पण पावसाळ्यात येथे येण्याचा आनंद काही औरच असतो. पावसाळ्यात येतील वातावरण सुंदर असते. पडणारा पाऊस व घाटातील सौदर्य मन प्रसन्न करुन जाते.

 – चेतन जाधव , भाविक सिन्नर

सप्तशृंगगडावर पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील परिसरात मोठया प्रमाणात हिरवळ होत असते. घाटात ठिकठिकाणी लहान मोठे धबधबे वाहताना दिसतात. घाटातील यी निसर्ग सौदर्यांचा भाविकभक्त आनंद घेतात. याबरोबरच घाटात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देता आल्या तर पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

– रवि बर्डे, मका विक्रेता

हेही वाचा :

The post सप्तशृंगी घाटात : काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुके.... appeared first on पुढारी.