सप्तशृंग गड: प्रशासन सज्ज, 91 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार

सप्तशृंग गड : पुढारी वृत्तसेवा – कळवण तालुक्याच्या बहुतांशी गावांना दरड कोसळून माळीन सारखी दुर्घटना होण्याचा संभाव्य धोका असून त्यासाठी प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगीगड हे हिटलिस्ट वर असून त्यासाठी 91 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

या गावांमध्ये दरड कोसळण्याचा संभाव्य धोका

सप्तशृंगगड या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळून घाट रस्ता बंद होणे हे प्रामुख्याने समोर आले आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड, मांगलीदर, ततानीपाडा, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगाव, तिर्हल, गांडळमोकपाडा, आमदर, लिंगामे, खर्डेदिगर, उंबरगव्हाण, चोळीचामाळ, हनुमंतमाळ, महाल, पायरपाडा, काठरे दिगर, बोरदैवत, देरेगाव, वणी, मोहनदरी, नांदुरी, मेहदर, मुळाणे वणी, वडाळे, मार्कंड पिंपरी, कातळगाव, पाळे पिंप्री, अशा तब्बल ३१ गावांमध्ये माळीणसारखी दरड कोसळणे, पावसामुळे भू स्खलन होण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे.

विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटींचा प्रस्ताव- पाठवला आहे. कळवणमध्ये अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी असून लोकवस्ती आहेत. सप्तशृंगी गडावरही पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या धोका अधिक असतो.

सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव

संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून 91 कोटी 20 लाखांचे तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यावर अद्याप तरी कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

बिगर संरचनात्मक स्वरूपाचा तीन कोटी दहा लाखांच्या चार कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च व मे 2024 या कालावधीत 260 कोटी 65 लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली आहेत. प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार त्यांच्या तांत्रिक समितीकडे पाठतात. कामांची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातो.

हेही वाचा: