सरकारकडून लॉन्स, मंगल कार्यालय, केटरिंग चालकांना टार्गेट; याचिका दाखल करण्याचा इशारा 

नाशिक : कोरोनाचा प्रसार वाढतो हे खरे असले तरी बाजारपेठा, मॉल, हॉटेल्स, प्रदर्शने राजकीय सभा-संमेलने सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या लग्नांमध्ये कोरोना नियमावली पाळली असून, सरकारने कोरोनाचे निर्बंध घालताना लॉन्स, मंगल कार्यालय, केटरिंग चालकांनाच टार्गेट केले आहे. यामुळे व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, सरकारने मदत करून त्वरित पावले उचलावीत, अन्यथा सरकारविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा केटरिंग असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष उत्तम गाढवे यांनी दिला आहे. 

लग्नसमारंभावरील निर्बंध उठवा 

अध्यक्ष उत्तम गाढवे म्हणाले, की नाशिकमध्ये लॉकडाउन काळात केटरिंग व्यावसायिकांचे शंभर कोटींचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पावले न उचलल्यास ऑल इंडिया केटरिंग असोसिएशन, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनतर्फे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. राहुल भावे म्हणाले, की लग्नसमारंभात शंभर लोकांना प्रशासनाची परवानगी आहे. मात्र केटरिंग व्यवसायातील कर्मचाऱ्यांनाही त्यात गणले जात असल्यामुळे नाहक भुर्दंड भरावा लागत आहे. निर्बंध उठवत मंगल कार्यालय, लॉन्सच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी द्यावी, असे भावे यांनी सांगितले.  

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

केटरिंग असोसिएशनचा याचिका दाखल करण्याचा इशारा 

कुसुमाग्रज स्मारकात गुरुवारी (ता. ४) पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी अध्यक्ष गाढवे, अनिल जोशी, पंकज पाटील, अमर वाणी, राहुल भावे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा