सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे : श्रमसंस्कार शिबीर विद्यार्थ्यांसाठी कलाविष्काराचे व्यासपीठ

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

महाविद्यालयीन जीवनात श्रमसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांसाठी खूप काही शिकण्याची संधी असते. शिबीरात विद्यार्थ्यांना विविध सुप्त कलागुणांचा अविष्कार सादर करण्याची संधी असून समाजकारण व कलाविष्कारासाठी श्रमसंस्कार शिबीर एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातर्फे बुधवारी (दि.४) शेवगेदारणा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर मविप्रचे नाशिक ग्रामीण संचालक रमेश आबा पिंगळे, नांदगाव तालुका सदस्य अमित बोरसे पाटील, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, सरपंच पुष्पा कासार, उपसरपंच मिना कासार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक पाळदे, व्हॉ. चेअरमन सुभाष कासार, पोलिस पाटील उज्वला कासार, दिपक कासार, किरण कासार, हिरामन पाळदे, शिवाजी कासार, मुख्याद्यापक अनिल पगार, मुख्याद्यापक एस. के. सुडके आदी उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना श्रम शिबीरात अतिशय शिस्तीने कामे करायला हवीत, ही शिस्त जिवनामध्ये उपयुक्त ठरते, आपण दररोज घरी काम करण्याचे टाळतो, मात्र शिबीरात काम केल्याने एक वेगळा अनुभव जिवनात मिळतो. त्याचप्रमाणे समूहात वागण्या बोलण्याचे व श्रमाचे संस्कार मिळत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एस.एस. काळे यांनी एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीरात सर्वाधिक मुलींचा सहभाग आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार होणे गरजेचे असून व्यक्तीमत्व व नेतृत्व विकासासाठी देखील मदत होते. याप्रसंगी उपप्राचार्य सोपान एरंडे, उपप्राचार्य डी. टी. जाधव, उपप्राचार्य एन. के. सोनवणे, शाम जाधव, एस. डब्यु पवार आदी उपस्थित होते. सविता आहेर यांनी सुत्रसंचलन केले. सुरेखा पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख मिलींद ठाकरे, कार्यक्रम अधिकारी देवराम ढोली यांनी केले.

हेही वाचा:

The post सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे : श्रमसंस्कार शिबीर विद्यार्थ्यांसाठी कलाविष्काराचे व्यासपीठ appeared first on पुढारी.