सर्वपक्षीयांकडून प्रसाद अन् शिवसेनेत भाजप महिला कार्यकर्त्यांचा प्रवेशही!

नाशिक : शिवसेनेने नूतनीकरण केलेल्या शालिमार चौकातील शिवसेना भवनात रविवारी (ता.१४) सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सत्यनारायणाचा प्रसाद घेतला, सोबतच दुपारी भाजपच्या द्वारका मंडलातील महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

भाजप महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीच्या द्वारका मंडलाच्या सरचिटणीस कल्पना भदाणे यांच्या नेतृत्वाखाली कमल माळी, अलका गायकवाड, मनीषा वाघ, मंगला बोरसे, संध्या धुमाळ, सुनंदा बोराडे, मीनाक्षी पाटील, सोनाली पाटील, वैशाली मुथ्‍था, करुणा धामणे आदी महिलांनी प्रवेश केला.  

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित

शिवसेनेच्या कार्यालयात रविवारी तीर्थप्रसादासाठी महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, अर्जुन टिळे, काँग्रेस महिला सेलच्या शहराध्यक्षा वत्सला खैरे, बबलू खैरे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.