सलग चौथ्या वर्षीही परंपरा कायम! 42 बहिणींचे 35 भाऊ आणि आगळीवेगळी भाऊबीज

सायखेडा (नाशिक) : सणवार म्हटलं की आपली चार माणसं येऊन आनंदोत्सव होणारच. सध्याच्या पिढीत नात्यांचा ओलावा कमी झाला असुन या पिढीत मामाचे गाव हरवले आहे. पण सायखेडा येथील कुटे परिवारातील सदस्यांनी एकत्र येत सलग चौथ्या वर्षी सामुहिक भाऊबीज आनंदात साजरी केली.

35 भावांच्या ४2 बहिणी

सायखेडा येथील कुटे परिवार काही शिक्षणासाठी तर काही नोकरीसाठी बाहेरगावी असतात. मात्र वर्षातला दिवाळी सण भाऊबीज दिवशी एकत्रच साजरा करतात. सध्याच्या पिढीत नात्यांचा ओलावा कमी झाला असुन या पिढीत मामाचे गाव हरवले आहे. मात्र हे प्रेम हा जिव्हाळा टिकवून ठेवण्यासाठी ते एकत्र येऊन सामुहिक भाऊबीज आनंदात साजरी करतात. कुटे परिवारातील जगन कुटे, प्रमोद कुटे, राहुल कुटे, अक्षय कुटे, संजय कुटे, महेश कुटे, सागर कुटे, निलेश कुटे , दिपक कुटे आदींनी यंदाची भाऊबीज एकत्रित साजरी करण्याची संकल्पना मांडली. आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यानिमित्ताने दोन दिवसीय कौंटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले व पाडव्याच्या दिवशी लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

यावेळी बहीण व दाजी यांनी जीवनातील चांगले वाईट अनुभव यानिमित्ताने सर्वांना सांगितले. एकमेकांची ओळख करून देण्यात आली व दरवर्षी असेच यानिमित्ताने भेटण्याचे ठरले. भाऊबीजच्या दिवशी बहिणींनी सर्व भावांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी ओवाळले व भाऊबीजेचा सामूहिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. याठिकाणी कुटे परिवारातील 35 भाऊ व 42 बहिणींसह 125 सदस्य उपस्थित होते. दरवर्षी अशीच भाऊबीज साजरी करण्याचा संकल्प देखील करण्यात आला.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग