सलग सुट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटनाच्या अर्थकारणास ‘बूस्ट’! मावळत्याला निरोप, नववर्ष स्वागतासाठी फुलली पर्यटनस्थळे

नाशिक/ पंचवटी/त्र्यंबकेश्वर : ख्रिसमसला जोडून आलेल्या सलग सुट्यांचे औचित्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. शहर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, शिर्डीसह धार्मिक पर्यटनासह वायनरी, पर्यटनस्‍थळांसह प्रेक्षणीय ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. लॉकडाउनच्या दीर्घकालीन मंदीनंतर शहर जिल्ह्यातील सर्वच प्रकारचे पर्यटन वाढले आहे. त्यामुळे मावळत्या वर्षाच्या 
निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकासाला ‘बूस्ट’ मिळणार आहे. 

मावळत्याला निरोप,​ नववर्ष स्वागतासाठी पर्यटनस्थळे फुलली 
जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाची मोठी परंपरा आहे. देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर, नाशिक, वणी आणि शिर्डीसाठी नाशिकला येतात. त्यात आता मांगीतुंगीसह नाताळमुळे इन्फ्रन्ट झिजस शाइन चर्च, बाळ येशू मंदिर, जेल रोड येथील कॅथड्रीलला भेटी देतात. सोबतच अनेक जण या काळात शहर-जिल्ह्यातील वायनरीला भेटी देतात. प्रेक्षणीय स्थळावर गर्दी सुरू झाली आहे. 
नववर्षाचे स्वागत प्रेक्षणीय व पर्यटनस्थळावर करण्यासाठी ठिकठिकाणच्या कुटुंबांकडून दौरे नियोजन सुरू झाले आहेत.

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

अनेक व्यवसायांना आला बहर

पवित्र त्र्यंबकेश्वर, वणी येथील सप्तशृंग मंदिर, रामकुंडासह कपालेश्‍वर, श्री काळाराम मंदिर पंचवटी परिसरात देशभरातील भाविकांची व पर्यटकांची वर्षभर मोठी वर्दळ असते. पण कोरोनाच्या लॉकडाउनमुळे सात-आठ महिन्यांपासून ठप्प असलेले पर्यटन पुन्हा एकदा फुलले आहे. पर्यटनासाठी गर्दी वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. यानिमित्ताने पूरक हॉटेल ट्रॅव्हल्स व्यवसायाला बहर आला आहे. विविध पूरक उद्योग व्यवसायात उत्साह आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

दर्शनाला रांगा 
नाताळच्या सलग आलेल्या सुट्यांमुळे व आठ महिने मंदिर बंद असल्याने कोरोना महामारीचे संकट झुगारून भाविकांची त्र्यंबकेश्वरल गर्दी उसळली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भक्तांना खुले असल्याने पूर्व मंडपाच्या बाहेर जुन्या महादेव मंदिरापर्यंत रांगा पोचल्या आहेत. मंदिराच्या मंडपात गैरसोय होऊ लागल्याने पूर्व दरवाजात उभारलेल्या मंडपात महिलांना अडचणीना तोंड द्यावे लागते. रस्त्यावर प्रसाधनगृहांचे सांडपाणी व त्यातूनच दर्शनाची लांब रांग, तिष्ठत दर्शन हे नेहमीचे रडगाणे व पद्धत सुरू झाली आहे. 

पार्किंग रस्त्यावर 
भाविकांची संख्या वाढल्याने शंभर रुपये द्या व गाडी शहरात न्या, असा नवा व्यवसाय बहरला आहे. पालिकेच्या व्यापारी संकुलातील व्यावसायिक दुकांनाऐवजी रस्त्यावर व्यवसाय थाटत आहेत. दुकाने व रस्ता असे दुहेरी काबीज केल्यानंतर पादचाऱ्यांना जागा शिल्लक राहात नसल्याने सारखे वादाचे प्रसंग येतात. 

 

धार्मिक कार्यासाठी उल्हासनगरहून सहकुटुंब नाशिकमध्ये आलो आहोत. येथील वातावरण पाहून खूप प्रसन्न वाटले. पुढील वर्षीही पुन्हा येऊन विधी करणार आहोत. -ॲड. मनीष वधवा, उल्हासनगर