साईबाबांच्या दर्शनाची इच्छा कायमचीच अपूर्ण; रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला

वणी (जि.नाशिक) : साईबाबांचा जयघोष करत अनेक जण रस्त्याने पायी शिर्डीला जात असतात. यावेळी साईबाबांना भेटण्याची तसेच दर्शनाची इच्छा मनात घेऊन साईभक्त जात होते. पण काळाचा असा घाला आला कि ती इच्छा त्यांची कायमची अपूर्ण राहिली. यामुळे परिवारात शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाचा घाला

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास चाचडगाव शिवारात (ता. दिंडोरी) पेठकडून नाशिककडे पायी जात होते. यावेळी दमण येथील भाविकांना अज्ञात वाहनाने विरुद्ध बाजूच्या दिशेने येऊन धडक दिली. नाशिक-पेठ रस्त्यावर चाचडगाव (ता. दिंडोरी) शिवारात अज्ञात वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन साईभक्तांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर झाल्याची घटना रविवारी (ता.१०) पहाटे घडली. या अपघातात मनीष धर्मेश हडपती (वय १५) व अश्‍विन ईश्‍वर पटेल (३५, दोघे रा. दमण) गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले हरीशभाई बाबूभाई पटेल (रा. दमण) गंभीर जखमी झाले.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरारी झाला. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण, युवराज खांडवी तपास करीत आहेत.  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप