साई भक्तांना खुशखबर! शिर्डीला जाण्यासाठी ‘सुपरफास्ट रेल्वेगाडी’

नाशिक रोड : मुंबईकरांना शिर्डीला दर्शनाला सहज जाता यावे, यासाठी रेल्वेने साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक रोडमार्गे मुंबई-साईनगर शिर्डीदरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट आरक्षित विशेष गाडी १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

नाशिक रोडमार्गे शिर्डीला रेल्वेगाडी 

०११३१ डाउन सुपरफास्ट गाडी दादर येथून दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी ९.४५ ला सुटेल आणि शिर्डीला दुसऱ्या दिवशी ३.४५ ला पोचेल. ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, कोपरगाव येथे ती थांबेल. शिर्डी येथून दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी १०.२५ ला गाडी सुटेल. सामान्य भाडे दराने २७ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आरक्षण मिळेल. www.irctc.co.in या वेबसाइटवरही ते सुरू होईल.  

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच