
पिंपळनेर, ता. साक्री पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील मालपूर व खुडाणे (निजामपूर) येथील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मालपूर गावचे विश्वेश्वर दौलत पाटील हे ठाणे जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली आहे. ते लवकरच येथील पदभार स्वीकारतील.
खुडाणे (निजामपूर) गावचे प्रशांत पाटील हे पुणे येथे आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) कार्यालयात सह संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती आरोग्य सेवा विभाग उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली आहे. ते देखील लवकरच येथील पदभार स्वीकारणार आहेत.
हेही वाचा :
- ताडोबा ऑनलाईन बुकींग प्रकरण – जिल्हा सत्र न्यायालयाने ठाकूर बंधूचा जामीन अर्ज फेटाळला
- नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही
- अहमदनगरकरांच्या दिमतीला आता पीएम ई-‘बस’; महापालिका प्रस्ताव देणार
The post साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती appeared first on पुढारी.