साडेतीन हजारांची लाच महावितरण कर्मचाऱ्याला पडली महागात; एंटी करप्शनने पकडले रंगेहाथ

सिन्नर (जि.नाशिक) : घरगुती वापराचे वीजमीटर व त्याची जोडणी करून देण्याच्या मोबदल्यात साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास सिन्नर शहर सबस्टेशन परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

महावितरण कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले  
सुधाकर शिवनाथ सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो महावितरण कंपनीत सिन्नर शहर कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त आहे. तक्रारदारास घरगुती वीजवापराचे मीटर व त्याच्या जोडणीचे काम करून देण्याच्या मोबदल्यात सोनवणे याने साडेतीन हजार रुपये मागितले होते. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सिन्नर येथील आडवा फाट्याजवळील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला होता.

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गुरुवारी (ता. १८) दुपारी सोनवणे याने पंच व साक्षीदारांच्या समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश