सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश

सातपूर www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

येथील प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगरमधील सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे व अन्य मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला.

इंद्रभान सांगळे यांचे प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, राधाकृष्णनगर, पिंपळगाव बहुला, श्रमिकनगर, गंगासागर नगर, विष्णूनगर, वास्तूनगर भागात मोठा जनसंपर्क आहे. नाशिक मनपा निवडणुकीत मनसेकडून दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळवली होती. त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे सातपूरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेला प्रभाग १० मध्ये बळकटी मिळाली आहे. इंद्रभान सांगळे यांच्या पत्नी कलावती यांचा गत पंचवार्षिक निवडणुकीत अवघ्या अकरा मतांनी पराभव झाला होता. सांगळे यांच्या प्रवेशावेळी खा. संजय राऊत, उपनेते सुनील बागूल, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, वसंत गिते, योगेश घोलप, विलास शिंदे, दत्ता गायकवाड, देवा जाधव आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.