सातव्या वेतन आयोगाची मनपा कर्मचाऱ्यांची मागणी 

नाशिक : राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिक महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने नाराजी व्यक्त करत १ जानेवारीपासून नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला दिल्या. 

सातव्या वेतन आयोगाची मनपा कर्मचाऱ्यांची मागणी
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु आयोग लागू करताना शासनाच्या समकक्ष पदांना जी वेतनश्रेणी लागू आहे. त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणी नको अशा सूचना दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही वेतनश्रेणी लागू करताना शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना स्थायी समितीने यापूर्वी दिल्या होत्या; परंतु प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडून विलंब केला जात असल्याने त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना

वेतनश्रेणीचा प्रश्‍न मार्गी लावून १ जानेवारीच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर ३१ डिसेंबरच्या आत अस्तित्वातील सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्यान विभागाने विनानिविदा ८.८४ कोटींची बेंच, खेळणी खरेदी केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला. या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण