नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील नागरीकांनी सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे व कोरोनाची साखळी तोडण्याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे. आगामी रमजान पर्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन केले आहे.
पोलिस आयुक्त पांडे यांचे नाशिककरांना आवाहन
पोलिस आयुक्त पांडे यांनी मंगळवारी (ता.१३) बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, नाशिकमध्येही परिस्थिती कठीण झाली आहे. यापूर्वी जारी निर्बंधांनुसार जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व रमजान पर्वानिमित्त समाजबांधवांनी साधेपणाने घरगुती पद्धतीने सण साजरे करण्याचे शासनाने सुचविले आहे. यासंदर्भात जारी परिपत्रकातील सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात
मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे नागरीकांनी टाळा
पांडे म्हणाले, जयंती निमित्त शहरात कोठेही मिरवणुका, शोभायात्रा काढण्यास परवानगी दिलेली नाही. मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे नागरीकांनी टाळावे. रात्री आयुक्तालय क्षेत्रात संचारबंदी असल्याने शहर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असेल असेही त्यांनी सांगितले.
केवळ पाच लोकांना अभिवादनाची परवानगी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण करण्यासाठी निर्बंध असतील. केवळ पाचच लोकांना परवानगी दिली जाईल. तसेच या नागरीकांनी मास्कसह अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू