सायकल शिकण्याच्या वयात ‘सिद्धांत’ची अनोखी कर्तब! साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या!

खामखेडा (जि.नाशिक) : अकरा बारा वर्षाच्या अनेक मुलांना धड सायकल देखील चालवता येत नाही. मात्र खामखेडा येथील सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या सायकल शिकण्याच्या वयात सिद्धांत बच्छाव या मुलाची कामगिरी परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. यामुळे साऱ्याच्यांच भुवया उंचावल्या आहेत.

सिध्दांतच्या कामगिरीने साऱ्याच्यांच भुवया उंचावल्या

सिद्धांत हा खामखेडा येथल कैलास बच्छाव या शेतकऱ्याचा मुलगा आहे. देवळा येथील तिरुपती इंग्लिश मिडीयम शाळेत मागील वर्षी पाचवीत शिकत होता. मार्चमध्ये शाळा बंद झाल्यात.तेव्हापासुन तो घरीच आहे. मार्चमध्ये शेतात वडिलांचे कांदा काढणी व इतर कामे सुरु झालीत. शेती कामासाठी व ट्रक्टर चालवण्यासाठी चालक मिळत नसल्याने व कैलास बच्छाव यांना ट्रक्टर चालवता येत नसल्याने बारा वर्ष सहावीत शिकणाऱ्या चिमुकल्याने सिद्धांत याने ट्रक्टर चालवत शेतीकामासाठी सुरवात केली. शेतातून कांदा ट्रॉली भरून चाळी जवळ रिकामीकरण, शेतातील चारा वाहून आणणे, त्याचबरोबर त्याने उन्हाळी कांद्यांचे शेत देखील ट्रॅक्टरने नांगरटणी केली. रोटरने शेती नांगरणे या सोबतच शेतातील इतर सर्व कामे तो सफाईदारपणे करू लागला आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

सर्वच काम तो लिलया करतो
वयाच्या अठरा वर्षांपर्यंत सायकलही चालवता येत नाही, असे अनेक मुल आपण पाहतो. पण, सिद्धांत याने शेतातील ट्रक्टरने केली जाणारे सर्व कामे ट्रक्टर अतिशय सफाईदारपणे चालवत शेतकरी वडिलांना शेती कामात मदत करत आहे. परिसरातील अनेक शेतकरी त्याच्या या वाहन चालवण्यातील सफाईमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. शेतातील ट्रक्टरने केली जाणारी सर्वच काम तो लिलया करतो. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

परिसरात कौतुकाचा विषय

मुलाच्या ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर मिळविलेली कमांड पाहून परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. खामखेडा (ता.देवळा) येथील अकरा वर्षीय सिद्धांत कैलास बच्छाव हा ट्रॅक्टरद्वारे शेतातील सर्व प्रकारची कामे करतो.त्याची शेतातील ट्रॅक्टरवरील ही कर्तबगारी परिसरात सर्वांना ठाऊक झाली आहे. 

मोबाईल व सोशल मीडियाचे फारसे आकर्षण नाही

सिद्धांत याने घरचा ट्रक्टर असल्याने चालकासोबत यांच्याबरोबर सुटीत ट्रॅक्टर चालवायला शिकला.बच्छाव यांच्याकडे दहा एकर शेती आहे.ही शेती ट्रॅक्टरद्वारे तयार करणे ,पिकांना औषध फवारणी करन हि कामे करावी लागतात.व प्रत्येक वेळी चालक मिळतोच असे नाही.त्यामुळे शेतातील मशागतीची कामे सिद्धांत करू लागला आहे. दुचाकी व कारही चालवायला शिकला आहे. सिद्धांत याने देखील विविध परीक्षांमध्ये यश संपादित केले असून अभ्यासात देखील चांगला आहे. सिद्धांत याच्या वयातील मुलांचे मोबाईल वेड पालकांना चिंता करायला लावते. मात्र, मोबाईल व सोशल मीडियाचे फारसे आकर्षण नसलेला सिद्धांत याने सुटीत वडिलांसोबत शेतीकामातील मदत परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

 

मला एकच मुलगा आहे. तो सध्या सहावीत शिकत आहे. मुली चांगल्या शिकल्यात.मुलाला देखील खूप शिकवायचे आहे. शेतातील काम फक्त त्याला करायला देत असुन त्याच्या सोबत नेहमी असतो.रस्त्यावर अथवा गावाबाहेर ट्रक्टर चालवायला मी देत नाही. - कैलास बच्छाव,शेतकरी खामखेडा.