सायबर क्राईमविरोधात जिल्हापोलीस व वकीलसंघ साथ-साथ; पोलीस अधीक्षकांचा सूतोवाच

चांदोरी (नाशिक) : सायबर गुन्ह्यात जिल्हा पोलीस व वकील संघ एकत्रित
 २१व्या शतकात दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना जिल्ह्यात दररोज विविध ऑनलाइन चोरीच्या घटना घडत आहे. या गोष्टी लक्षात घेता नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस व नाशिक बार असोसिएशन च्या माध्यमातून एकत्रित सामोरे जात शेतकरी ते सर्वसामान्य नागरिक यांचे आर्थिक कवच सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड नितीन ठाकरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची शुक्रवारी (ता. 8) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

राज्यात पहिला अभिनव उपक्रम

आज पावेतो ऑनलाइन फसवणुकीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असताना न्यायप्रक्रियेत त्यास विलंब होत असतो. त्यावर हा तोडगा प्रभावी ठरणार आहे. पोलीस व वकीलसंघांचे दोन्ही प्रमुख एकत्र येऊन प्रक्रिया गतिमान करण्यास हातभार लावणार असल्याने राज्यात हा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्यामुळे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दररोज सायबर क्राईम वाढत चालल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले जात आहे. तंत्रज्ञान प्रगत होत जातांना देखील विविध आर्थिक गुन्हे घडले जात आहे. यासाठी तब्बल ५००० हुन अधिक वकील सहभागी होणार असून पोलीस व वकिलांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

नाशिक बदली होण्यापूर्वी सायबर संबंधित जामतारा येथे मोठे रॅकेट उध्वस्त केले होते. आताही वकील संघाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकी बद्दल जनजागृती करून अटकाव केला जाणार आहे. - सचिन पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार