
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आर्थिक फसवणूक तसेच इतर सायबर गुन्हेगारीसाठी ‘फेक कॉल्स’चा वापर करण्यात येत असून, याला नेटिझन्स बळी पडत आहेत. विशेषत: काही दिवसांपासून व्हॉटस ॲप वापरकर्त्यांपैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून अनोळखी फोन कॉल येत आहेत. हे कॉल्स फसवणारे असण्याची शक्यता केंद्रीय सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सध्या व्हॉट्सॲप किंवा फेसबुक मेसेंजरवर ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात ‘मिस्ड कॉल्स’ देण्याचे पेव फुटले आहेत. अनेकदा अनोळखी क्रमांकाद्वारे संपर्क साधत सायबर गुन्हे करण्यात येतात. त्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात माहिती संकलित करून गंडा घालण्यात येतो. अनेकांची बदनामी करण्यासह डेटा चोरी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून ‘मिस्ड कॉल्स’ आल्यास संपर्क न करता थेट ‘रिपोर्ट करून ब्लॉक’ करण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, नाशिकमध्येही काही युजर्सना या स्वरूपाचे ‘मिस्ड कॉल्स’ आल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, या स्वरूपातल्या लेखी तक्रारी पोलिसांना प्राप्त नाहीत. तर, या स्वरूपाच्या तक्रारी राज्यासह देशांत अनेक ठिकाणी दाखल होत असल्याने सायबर पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
फसवणूक टाळण्यासाठी व्हॉट्सॲपवर ‘मिस्ड कॉल’ येणारे नंबर ‘ब्लॉक’ करा. नागरिकांनी आर्थिक फसवणूक अथवा मागणी झाल्यास १९३० क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांना सायबर गुन्ह्यांसंदर्भात http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही तक्रार नोंदविता येईल.
– डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर पोलिस स्टेशन
हेही वाचा :
- नगर : सेतू चालकाला भाडे देण्याचे आदेश
- पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार ! सिंहगडावर दरडी कोसळण्याचा धोका कायम
- Karnataka Election Result – कर्नाटकात लोकशाहीचीच स्टोरी चालली : संजय राऊत
The post सायबर गुन्हेगारीसाठी 'मिस्ड कॉल'चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन appeared first on पुढारी.