दिंडोरी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने वसुली सुरू असून, बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेच्या नावे हुकूमशाही पद्धतीने लावण्याची मोहीम सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी बचाओ कृती समितीच्या वतीने नाशिक येथील जिल्हा बँक कार्यालयावर सोमवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी बचाओ कृती समितीचे गंगाधर निखाडे यांनी दिली.
जिल्ह्यातील ६६ हजार शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या शेतावर बँकेच्या वतीने फलक लावण्यात आले होते. सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू आहे. त्या विरोधात बँकेवर मोर्चा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माजी आ. रामदास चारोस्कर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, किसान सभा राज्य सचिव राजू देसले, दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे आदींसह शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा निघणार आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
हेही वाचा: