सावत्र पित्याच्या कुकर्माचा अखेर भांडाफोड; अल्पवयीन मुलीने मावशीजवळ मांडली धक्कादायक व्यथा

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : आकाशने एका महिलेशी प्रेमसंबधांतून विवाह केला होता. या महिलेस एक १३ वर्षे वयाची मुलगीही आहे. परंतु काही दिवसांनंतर आकाशच्या कुकर्माचा भांडाफोड अखेर झाला. हा प्रकार समोर येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मावशीजवळ मुलीने व्यथा मांडली

आकाश सचिन सूर्यवंशी (रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत) असे या नराधमाचे नाव असून त्याने बेहेड रस्त्यालगत राहणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबधांतून विवाह केला होता. या महिलेस एक १३ वर्षे वयाची मुलगीही आहे. काही दिवसांपासून आकाश सूर्यवंशी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता. पीडित मुलीने काही दिवस हा प्रकार सहन केल्यानंतर मावशीजवळ आपली व्यथा मांडली. त्यामुळे आकाशच्या कुकर्माचा भांडाफोड झाला.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संतापजनक प्रकार

दरम्यान, पोलिसांनी त्याला पॉक्सोअंतर्गत अटक केली. हा प्रकार समोर येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पी. वाय. काद्री यांनी घटनास्थळी भेट दिली. एका नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार पिंपळगाव शहरात समोर आला आहे. आकाश सचिन सूर्यवंशी (रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत) असे या नराधमाचे नाव असून, त्याला बाललैंगिक अत्याचारा (पॉक्सो)च्या अंतर्गत अटक करण्यात आली.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा