सावरपाडा एक असंही गाव! पाण्यासाठी जीवघेणी कसरत; ‘माझा’च्या बातमीनंतर झाली सोय

नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या खरशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील  सावरपाडा मधील आदिवासी महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास, लहान मुलांचा थरकाप उडविणारा संघर्ष एबीपी माझानं उभ्या महाराष्ट्र समोर मांडला होता. या वृत्राची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यांनी सावरपाडामध्ये जाऊन उपाययोजना करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. त्यानंतर नाशिक आणि मुंबईच्या शिवसैनिकांकडून आदेशाची अंमलबजावणी करत अवघ्या दोन दिवसात तास नदीवर 30 बाय 4 फुटांचा लोखंडी पूल बसविण्याचे काम सुरू झालं आणि  स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीही नदी ओलांडण्यासाठी पूल नव्हता. पिढ्यान पिढ्या जीवघेणी कसरत सुरू होती ती समस्या आज दूर झाली आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वकच्या खरशेतच्या आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत संपणार आहे, अशी बातमी एबीपी माझानं दाखवली होती. या बातमीची शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी देखील दखल घेतली आहे. खरशेतमधील घराघरात पाईपलाईननं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत गोडसे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हंडाभर पाण्यासाठीही इथल्या महिलांची होणारी परवड आणि त्यासाठी तिला करावी लागणारी पायपीट एबीपी माझानं दाखवली होती.  याचीच दखल घेत घराघरात पाईपलाईननं पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

जल जीवन मिशन नावाची 3 लाख 60 हजार कोटींची योजना राबवण्याचं एक मोठ स्वप्न सरकारनं लोकांना दाखवलं. अनेकांना तर घरच्या अंगणात पाणी खेळण्याची स्वप्न पडली.  पण  सरकारच्या योजना समाजात तळापर्यंत कशा झिरपत नाहीत याचं दाहक वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं. आपल्या महाराष्ट्रातलंच एक गाव जे शहरापासून फार दूरही नाही. नदी उशाला, मात्र प्रदुषणाचं पातक घेऊन वाहणारी. पण त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी इथल्या महिलांची परवड आणि लहानग्यांचा जीवघेणा प्रवास  एबीपी माझानं दाखवला होता.

संबंधित बातम्या

Nashik : सावरपाड्यात पाण्यासाठी स्थानिकांची कसरत, माझाची बातमी, आणि थेट आदित्य ठाकरे यांची दखल

Nashik Water:नाशिकमध्ये आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत : ABP Majha

Nashik : 'माझा'च्या बातमीनंतर खारशेतमधील घराघरात पाईपलाईननं पाणीपुरवठा : ABP Majha

Nashik: हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी, प्रदूषित नदीमुळे गाव तहानलेलं ABP Majha