सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर

सावाना वाचक मेळावा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
182 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात 10 हजार पर्यंत सभासद, तर 10 लाखांपर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध असूनही शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सभासद संख्या कमी आहे. बर्‍याचदा वाचक केवळ निवडणुकीच्या वेळी येतात आणि नंतर वाचनालयात येत नसल्याचे सुहास टिपरे या सभासदाने सार्वजिनक प्रश्नमंजूषा कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहानिमित्त शुक्रवार, दि. 30 डिसेंबर रोजी वाचक मेळावा व प्रश्नमंजूषा कार्यक्रम सावाना सभासंदासाठी आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक वाचनालयाच्या सभासदांनी वाचक मेळाव्यात यावेळी आपली मते व्यक्त केली. बालवाचक केवा पारनेरकर हिने पूर्वी इंटरनेट नव्हते तेव्हा पुस्तक ही मनोरंजनासाठी वाचली जात होती. वाचनाची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला चार-पाच पानांपासून करावी. त्यानंतर गोडी लागल्याचे मत तिने मांडले. सेवानिवृत्त शिक्षक आंनद शिंदे म्हणाले, मोबाइलमुळे लहानपण, तरुणपण, म्हातारपण खाऊन टाकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वाचनालयात एक पेटी ठेवून त्यात सभासदांना मत व्यक्त करता येईल, असे सांगितले. तर अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी वाचनामुळे शब्दकोश वाढतो, कथा सुचते लिहिता येते. वाचन केले तर लिहिता येते तसेच वर्तणुकीत बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले. विजया देशपांडे म्हणाल्या, 30 वर्षे सार्वजनिक वाचनालयाची सभासद आहे. साहित्यिकांच्या विचारांमुळे वागण्याची, बोलण्याची जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. याचबरोबर सुरेश पवार, भूषण आढाव बालवाचक रूद्रांक्ष सूर्यवंशी, ओम सोनवणे यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्यांनतर सभासद वाचकांनी प्रश्नमंजूषा कार्यक्रमात प्रश्न उपस्थित करून सावानाला सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर यावेळी धर्माजी बोडके, अ‍ॅड अभिजित बगदे, वैद्य विक्रांत जाधव, गिरीश नातू, सुनील कुटे, संजय करंजकर उपस्थित होते. किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. शुक्रवार, दि. 30 डिसेंबर रोजी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे ‘जनजाती प्राचीन भारताचा वैभव संपन्न इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

हेही वाचा:

The post सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर appeared first on पुढारी.