
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची 1मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय काम लक्षात घेऊन आपल्या सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयासाठी आ. देवयानी फरांदे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. २०२२ च्या पुरस्काराची तयारी पूर्ण झालेली असून घोषित करणे बाकी असल्याची माहीती प्राप्त होत आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी असते त्यादिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करणे अवचित्याला धरून असल्याचे स्पस्ट करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ घोषित करून ३ जानेवारीला वितरीत करणे करण्याची मागणी आ. फरांदे यांनी केली. याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश सचिव शालेय शिक्षण यांना दिले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेगवान कारवाई करून ३ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
– देवयानी फरांदे, आमदार
हेही वाचा :
- औंध, धनकवडीत बांधकामांवर कारवाई
- पिंपरी : साडेतीन हजार बालकांना गोवरचा डोस
- औंध, धनकवडीत बांधकामांवर कारवाई
The post सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची मागणी appeared first on पुढारी.