Site icon

साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव !

जळगाव पुढारी वृत्तसेवा; साहित्य संमेलन हे पुस्तक, विचार आणि विचारवंत यांचा एक अविभाज्य नातं असलेले संमेलन असते. मात्र साने गुरुजींच्या पवित्र भूमिती दुसऱ्यांदा होणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्यिक दिसून न दिसल्यासारखे दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव निर्माण झाली का अशी भावना निर्माण झाली होती. साहित्य संमेलनात साहित्यिकांच्या गर्दी बरोबरच प्रेक्षकांची ही गर्दी असते मात्र साने गुरुजींच्या भूमीत झालेल्या या संमेलनामध्ये बाऊन्सर म्हणजे सुरक्षा रक्षक यांचीच गर्दी अधिक दिसून येत होती. पुस्तकांचे स्टॉल जवळ विद्यार्थी संख्या अधिक तर दर्दी असलेल्या वाचकांची गर्दी कमी होती. बऱ्याच ठिकाणी मंडपात उपस्थित मान्यवर संयोजक व ठराविक प्रेक्षक दिसत होते. यात राजकीय गोतावळा दिसून आला त्यातही पक्ष व पक्षाचे नेते न आल्याने नेत्यांनी फिरवलेली पाठही दिसून आली. त्यामुळे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चांगलेच गाजले.

साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा मेळावा असतो. मात्र साने गुरुजींच्या कर्मभूमीत झालेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये राजकीय घडामोडी व राजकारणाच्या व पक्षांच्या नेत्यांच्या हालचालीवरून युती मधल्या नेत्यांनी सुद्धा आपल्या हालचाली काही जागांवर त्या मर्यादित केलेल्या दिसून आल्या.

पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमळनेर येथे उपस्थिती लावल्याने त्यांच्या हस्ते क्रीडा संकुलनाचे उद्घाटन झाले व त्यांनी पाडळसर धरणाला भेट दिली. मात्र या भेटीत महायुतीचे संकट मोचक व भाजपाचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे दोघे ठिकाणी दिसले नाही. त्यांनी व्यासपीठावरच हजेरी लावली. कार्यक्रमाच्या समारोपला स्वागताध्यक्ष यांनी अनुपस्थिती देऊन आपला वेगळाच संकेत दिला. जेव्हा ते जळगाव जिल्ह्यात होते त्यांनी जळगावला पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर टीका केली.

या साहित्य संमेलनामध्ये स्थानिक मंत्र्यांना किंवा पालकमंत्र्यांना दुय्यम स्थान दिलेले दिसून आले. मात्र भाजपाचे मंत्री यांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वागत अध्यक्ष बनवण्यात आले होते तर साहित्य संमेलनामध्ये प्रथमच संरक्षक हे पद ऐकू आले जे पद जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात आले होते. अमळनेरचे सुपुत्र व मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

साहित्यिक हा येणाऱ्या पिढीला किंवा युवा पिढींना एक मार्गदर्शक ठरत असतो. मात्र या साहित्य संमेलनामध्ये बंदी असतानाही प्लास्टिक  बाटल्यांचा वापर करण्यात आला व ते जागोजागी पडलेले दिसूनही आले. अन्न मोठ्या प्रमाणात वाया गेलेले दिसून आले.
पहिल्या दिवशी नाश्त्यापासूनच सुरुवात झाली. शेवटी गेट बंद करून नाश्ता संपला असे सांगण्यात आले. उसळ मध्ये उसळीचाच पत्ता नव्हता.  बाहेरून येणाऱ्या प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना शौचालय बाथरूम यांची संख्या कमी दिसून आली. जी सोय होती ती अशा ठिकाणी  होती की त्या ठिकाणी महिलावर्ग लवकर जाऊ शकत नव्हता.

सभा मंडपात सुरुवातीला पाण्याची व्यवस्था दिसून आली नाही. ज्यावेळेस मान्यवर मंडपामध्ये आले तेव्हा सोय झाली. तर साहित्य संमेलनाला आलेले सूत्रसंचालक हे आपल्या भाषेवर किती प्रभुत्व आहे व आपण राजकीय नेत्यांना कोणकोणत्या उपमाने संबोधित करू शकतो व त्यांच्यातील गुण कोणते हे दाखवण्यात जास्त भर देताना दिसून आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपले संपूर्ण छापील भाषण वाचून दाखवले मात्र त्या भाषणाचा सार त्यांनी वाचलाच नाही. जे भाषण छापून पूर्ण मंडप मध्ये वाटण्यात आले होते ते वाचण्या मागचा हेतू काय हेच समजले नाही.

साहित्य संमेलन ची उभारणी मंडप मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र ज्या ठिकाणी परिसंवाद होत होते त्यापासून पुस्तकचे स्टॉल खूप लांब होते. स्टॉल जवळच फक्त एकच परिसंवादाचे मंडप ठेवण्यात आलेला होता. कोणता विभाग कुठे आहे याचे दर्शक किंवा दिशादर्शक कुठेच लावण्यात आले नव्हते. या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी मंडळी सेल्फी काढताना दिसून आली.

साहित्य संमेलनाचा मुख्य मंडप त्याच्या बाजूला जेवणाची व्यवस्था व त्याच्या नंतर पुस्तकांचे स्टॉल व एक परिसंवादाचा मंडप प्रकाशन कट्टा अशी व्यवस्था साहित्य संमेलनात करण्यात आली होती. त्यामुळे कुठे काय सुरू आहे हे कोणालाच समजत नव्हते जे परिसंवाद भाग घेणारे आहेत किंवा पत्रकार यांनाच पत्रिका वाचून त्या ठिकाणी जावे लागत होते. शेवटच्या दिवशी राज्याचे मराठी भाषेचे मंत्री ना. दीपक केसरकर आले. मात्र संध्याकाळी हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी अडचण असल्यामुळे त्यांनी आपले भाषण उरकून लागलीच निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण ऑनलाईन झाले.

हेही वाचा :

The post साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव ! appeared first on पुढारी.

Exit mobile version