साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी मनोहर शहाणेंचे नाव पुढे; डॉ. शोभणेंचे नाव मागे पडल्यात जमा 

नाशिक : नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी नाशिककरांनी ज्येष्ठ लेखक मनोहर शहाणे यांचे नाव पुढे केले आहे. यापूर्वी संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आलेल्या नावांपैकी मराठी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचे नाव मागे पडल्यात जमा असल्याची चर्चा होती. 

संमेलनाध्यक्षपदाच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब

डॉ. अनिल अवचट, भारत सासणे आणि डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे यापूर्वीच चर्चेत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक २३ आणि २४ जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे. त्यामध्ये संमेलनाध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, श्री. शहाणे यांचे नाव विनोदी लेखक चंद्रकांत महामिने, पंडित सोनवणी, दिगंबर गाडगीळ, नरहरी भागवत, नरेश महाजन, रमाकांत देशपांडे, सुरेश थिटे यांनी संमेलनाचे यजमान लोकहितवादी मंडळाकडे सूचवल्याची माहिती संमेलनाच्या तयारीत व्यस्त असलेल्यांकडून समजले. कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा अशा विविध क्षेत्रांत शहाणे यांनी जी साहित्यनिर्मिती केली आहे, तिचा योग्य गौरव होणे आवश्यक आहे. प्रसिद्धी, गटबाजीपासून सदैव दूर असलेले शहाणे गेली साठ वर्षे लेखन करीत आहेत. सत्यकथेचे प्रयोगशील लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते, असे त्यांच्या नावाची शिफारस करताना स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात