साहित्य संमेलन पुढे ढकलणार? आज औरंगाबादहून अधिकृत घोषणेची शक्यता 

नाशिक : सारस्वतांसह साहित्यरसिकांना पर्वणी ठरणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित वेळेत होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संमेलन पुढे ढकलणार असल्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. या संदर्भात औरंगाबाद येथे बैठक झाली असून, रविवारी (ता. ६) महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील पत्रकार परिषद घेऊन संमेलन स्थगितीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 

संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळ, मुख्य समन्वयक विश्‍वास ठाकूर, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांची बैठक झाली असून, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. संमेलन दिल्लीला न घेण्यामागे आर्थिक वर्षात निधी खर्चाबाबतचे नियोजन हेही कारण समोर येत होते. मात्र, संमेलनाच्या खर्चाबाबत पुढील आर्थिक वर्षात सरकारची परवानगी घेऊन अडचण दूर केली जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, संमेलन पुढे ढकलले गेल्यास ते मेमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून येऊ लागला होता. बाहेरून येणाऱ्यांकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, याची शक्यताही नाकारता येत नव्हती. राज्यात सध्या मुंबई, पुणे, ठाणे आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे. 
 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा