साहेब… कांद्यापासून वाईन बनवा; शेतकऱ्यानं काढलेलं व्यंगचित्र व्हायरल

Nashik News : राज्य सरकारने द्राक्षापासून तयार होणारी वाईन मॉल आणि किराणा दुकानात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असताना त्यावरुन चांगलाच गदारोळ उठविला जात आहे. अनेकजण शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होईल, असं सांगत आहेत. तर विरोधी पक्ष याला कडाडून विरोध करत आहेत. सध्या हे राजकीय द्वंद्व सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे.

राज्यात अनेक फळांचे ज्युस आणि त्यापासून वाईन तयार केली जाते. असं असलं तरी त्याला सरकारी अधिकृत मान्यता नाही. केवळ द्राक्षापासून तयार होणाऱ्याच वाईनला पारवानगी आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. त्यातच वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांचं उत्पादनसुध्दा अनेक शेतकरी घेत असतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात वाईन तयार करणाऱ्या फॅक्टरीसुध्दा मोठ्या संख्येनं आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, निफाड तालुक्यातील विंचूर येथिल असलेले वाईन पार्क. वाईन ही दारु की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता एक वेगळीच मागणी एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं कार्टुनच्या माध्यमातून केली जात आहे. ज्यात त्यानं कांदा हा आयुर्वेदिक असून त्याची पण वाईन करा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यालासुध्दा न्याय द्या, अशी मागणी केली आहे. त्यांनी कार्टुनच्या माध्यमातून राज्याच्या कृषीमंत्र्याकडे कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी आणि कार्टुनिस्ट संजय मोरे यांनी ही कविता केली आहे. ज्यात त्यांनी कांद्यापासून वाईन तयार केली. तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, अशी व्यंगत्मातक मागणीही केली आहे.

एकुणच ज्या फळापासून वाईन तयार केली जात आहे. ते द्राक्ष अनेक वेळा निर्यातक्षम असतांना अनेक वेळा अडचणीच निर्माण होऊन त्याचं नुकसान होतं, तोच न्याय कांद्याला पण मिळावा आणि कांद्याची पण वाईन तयार व्हावी, अशी मागणी या शेतकऱ्यानं कवितेच्या माध्यमातून केल्यानं सध्या हे कार्टुन आणि कविता सगळीकडे व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Beed Organic Farming : तरुण शेतकऱ्याने उभारलेल्या प्रकल्पातून परदेशात निर्यात होतात गांडूळ

ऊस बिलातून जवाहर कारखान्याने वसूल केले वीज बील, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha