सिडकोतील पवननगर भागात गोळीबार

गोळीबार

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिडको भागात पून्हा गोळीबार ची घटना घडली सिडको भागातील पवननगर भागात सराईत गुन्हेगार ने गुरुवारी रात्री काहीना मारण्या साठी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहीत माले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गोळीबार घटनेने पवननगर परिसरात घबराट पसरली होती .

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की सिडकोतील पवननगर भागात गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगार रोहीत माले ( वय २८ ) रा नाशिकरोड याने कोणाला मारण्यासाठी गोळीबार केल्याचे उघडकीस आले . पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुकत मोनिका राऊत .सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटना स्थळी जाऊन परिसरातील फुटेज तपासले व आरोपी रोहीत माले निष्पन्न झाला आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी रोहीत माले वर भादवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयित आरोपी मालेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे  आहेत . माले याने का गोळीबार केला व कोणावर केला तसेच त्यांच्यासमवेत कोण होते याचा तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

The post सिडकोतील पवननगर भागात गोळीबार appeared first on पुढारी.