सिडको विभागात आतापर्यंत कोरोनामुळे १८३ मृत्यू; धक्कादायक बाब समोर

मोरवाडी (नाशिक) : सिडको विभागाच्या आरोग्य केंद्रांतर्गत मार्च २०२० ते मार्च २०२१ या वर्षभरात एकूण १२ हजार ९५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यांपैकी तब्बल १८३ रुग्ण कोरोनामुळे मरण पावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सिडको विभागात आतापर्यंत १८३ मृत्यू

मोरवाडी शहरी आरोग्यसेवा केंद्रांतर्गत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ९७७, तर मृत्यू पावलेल्यांची संख्या १७, अंबड शहरी आरोग्यसेवा केंद्र एकूण कोरोनाबाधित ७६०, तर मृत १७, पिंपळगाव खांब शहरी आरोग्यसेवा केंद्र एकूण रुग्ण दोन हजार ८३३, तर मृत्यू १९, सिडको शहरी आरोग्य केंद्रांतर्गत एकूण रुग्ण दोन हजार ९११, एकूण मृत्यू ५२, कामटवाडे शहरी आरोग्यसेवा केंद्र एकूण रुग्ण एक हजार ९४६, एकूण मृत्यू २४, पवननगर शहरी आरोग्यसेवा केंद्र एकूण रुग्ण दोन हजार ५३२, मृत्यू ६२ झाले आहेत. सिडको विभागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ हजार ९५९, तर मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या १८३ झाली आहे. सध्या ४५ ते ६० वयोगटाच्या पुढील नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

प्रत्येकाने नियम पाळणे आवश्यक

सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालय, हेडगेवार चौक, कामटवाडे आदी आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे, तसेच कोरोनाची चाचणीदेखील करण्यात येत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने नियम पाळणे आवश्यक आहे.

४५ वयोगटाच्या खालील आजारी व्यक्ती  ६० वर्षांच्या वरील नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. -डॉ. नवीन बाजी, वैद्यकीय अधीक्षक, प्रभारी, श्री स्वामी समर्थ रुग्णालय