सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : शालिमार येथील जिमखाना पार्किंगमधून पार्क चारचाकी जबरदस्ती घेऊन जात वाहनचालकाकडे खंडणीची मागणी केली होती. या संशयिताला पोलीसांनी अगदी सिनेस्टाईल पध्दतीने ताब्यात घेतले आहे. 

सिनेस्टाईल पाठलाग करून संशयितास अटक 
शालिमार येथील जिमखाना पार्किंगमधून पार्क चारचाकी जबरदस्ती घेऊन जात वाहनचालकाकडे खंडणीची मागणी केली होती. ११ नोव्हेंबर २०२० ला भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयित विविध जिल्ह्यांत फरारी होत असल्याने अटक करण्यात अडचण येत होती. मंगळवारी (ता. २६) संशयित द्वारका भागात आल्याचे ट्रेस झाले.

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

पोलिसांनी चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. पथकाने त्याचा सिनेस्टाइल पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत.  खंडणीप्रकरणी सुमारे अडीच महिन्यांपासून फरारी संशयित समीर नासीर पठाण ऊर्फ छोटा पठाण (वय ३२, रा. वडाळागाव) याला भद्रकाली पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता, सोमवार (ता. १)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्ता पवार, गुन्हे शोधपथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्‍वर मोहिते, बी. एन. जाधव, आर. बी. कोळी, एन. डी. जाधव, मन्सूर सय्यद, गणेश निंबाळकर, एस. पी. निकुंभ, एम. एस. सय्यद, सचिन म्हसदे, एल. एच. ठेपणे, के. एस. सय्यद, जी. एल. साळुंके, संजय पोटिंदे सायंकाळच्या सुमारास द्वारका भागात दाखल झाले.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच